पुणे मेट्रोच्या रखडपट्टी वरून नितीन गडकरी यांचा शरद पवारांना टोला

पुणे: नागपूर मेट्रो चे काम हे अवघ्या चाळीस मिनिटात फायनल होते पण पुणे मेट्रो चे काम फायनल व्हायला एक दिवस पुरत नाही. कारण पुण्यातील काही जेष्ठ विद्वान लोक ही खूप हुशार आहेत असा टोला नाव न घेता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना लगावला.

भांडारकर संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले पुणे मेट्रो चे काम फायनल करण्या साठी शरद पवार व मेट्रो मधील काही मंडळी आम्ही चर्चेला बसलो होतो पण काम कशा पद्धतीने सुरू करावे याचा काही निर्णय होईना शेवटी मी आणि माझे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर मध्ये चर्चला बसून पुणे मेट्रो चे काम कसे कशा पद्धतीने सुरू करावे .याचा निर्णय घेतला. 

अनिल अंबानी यांनी एकदा माझ्यासमोर चाळीस कोटी रस्त्याच्या कामासाठी मला देतो असे सांगितले होते. विविध लोकांनी माझ्यासमोर यासाठी प्रस्ताव ठेवले होते पण मी अनिल अंबानी यांना मला तुमचा प्लॅन नको त्यामुळे अनिल अंबानी व काही लोकं नाराज पण झाली होती. मी महाराष्ट्रात एवढे भरपूर काम केले आहेत की माझ्याकडे पैसा हा भरपूर झाला आहे तो माझ्याकडून खर्च पण होत नाही. त्यामुळे पुणेकरांनी पैसा हा खर्च करावा. असे नितीन गडकरी म्हणाले,

देशाची संस्कृती महान असून, इतिहास आणि संस्कृतीचा संबंध हा जीवनमूल्यांशी आहे. इतिहास आणि धर्म याचा योग्य अर्थ समजावून सांगण्यात आपण कमी पडलो.इतिहासाचा जास्त उपयोग हा उकाळ्या पाकाळ्या काढण्यासाठी होतोय, हे आमचे दुर्भाग्य आहे. इतिहासाचा उपयोग हा देश आणि समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे. वादविवादातून कोणाचे कल्याण होत नाही, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सध्या इतिहासातील मुद्यांवरून वाद विवाद उकरून काढणाऱ्यांचे नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्ष कान टोचले.

गडकरी म्हणाले, कर्मकांड, जातीयवादाच्या संकल्पनेला धर्मात कोठेही आधार नाही. इतिहास, संस्कृती आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती ही समाजाची मोठी शक्ती आहे. भौतिकवादातून कितीही प्रगती केली तरी सुख मिळत नाही. पालक आणि शिक्षकांकडून जे संस्कार मिळतात, त्यातून जे माणूसपण येते त्यावर घराचे सुख अवलंबून असते. असे नितीन गडकरी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: