भविष्यात शिवसेनेशी युती होऊ शकते – प्रकाश आंबेडकर
अकोला : जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जंयत्तीची धामधूम सुरू आहे. याच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठे विधान केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘भविष्यात शिवसेनेसोबत युती होऊ शकते’, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. अकोला येथे ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी एकदा मला भेटायला बोलावले होते. मात्र युती संबंधांत त्यावेळी काहीही चर्चा झाली नाही. मात्र भविष्यात भविष्यात शिवसेनेसोबत युती होऊ शकते.