दुसरे मराठी सोशल मीडिया संमेलन रंगणार पुण्यात 

पुणे : दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे २९ एप्रिल ते १ मे दरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. समीर आठल्ये, मंगेश वाघ आणि प्रदीप लोखंडे यांनी स्थापन केलेल्या डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी या संस्थेच्या वतीने हे संमेलन होणार असून संमेलनाचे तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे कार्यक्रम संपन्न होतील.
आज पत्रकार परिषदेत याबाबद माहिती देण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, मगरपट्टा सिटी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, प्लॅनेट मराठीच्या सह-उपाध्यक्षा जयंती वाघदरे, संमेलनाच्या आयोजकांपैकी समीर आठल्ये, मंगेश वाघ, प्रदीप लोखंडे, विनायक रासकर हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
मिरॅकल इव्हेंट्सचे प्रमुख विनायक रासकर हे संमेलनाचे आयोजन व व्यवस्थापनाची जवाबदारी सांभळणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होत असलेल्या संमेलनास प्रवेश विनामूल्य असेल. तसेच फेसबुक व युट्यूबवर याचे थेट प्रक्षेपणदेखील केले जाणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरुपात रसिकांना संमेलनात  सहभागी होता येणार आहे. परंतु कोणत्याही स्वरूपातील (प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन) संमेलनात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी करणे मात्र अनिवार्य आहे.  मोफत ऑनलाइन नावनोंदणी www.thesammelan.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून करता  येईल.
यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले,”  करोनाच्या काळात बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. सोशल मीडियामध्ये खरोखरच ताकद आहे. विद्यापीठाप्रमाणे सोशल मीडियाही शिक्षणाचे एक माध्यम आहे. याची व्याप्ती प्रचंड मोठी असून, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे.”
सतीश मगर म्हणाले,”  सोशल मीडियाचा विस्तार खूप मोठा आहे. अगदी गावकोपऱ्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची व्याप्ती आहे. अनेक जण सोशल मिडियाद्वारे प्रभावित होतात. त्यामुळे तो भरकटू न देता त्याला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. या संमेलनाच्या माध्यमातून ते कार्य घडेल ही अपेक्षा आहे.”
संमेलनाविषयी बोलताना प्रदीप लोखंडे बोलताना म्हणाले की, मराठी सोशल मीडिया संमेलन असे जरी या उपक्रमाचे नाव असले तरीही ते प्रत्यक्षात आयोजित केले जाते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, त्यांचे फॉलोअर्स, पॉलिसी मेकर्स, तज्ज्ञ आणि सेलिब्रिटींना भेटण्याची संधी यामाध्यातून मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: