शरद पवारांचे नाव यूपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही – सुशील कुमार शिंदे

पुणे : युपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे.  त्यामुळे पुढचे युपीएचे अध्यक्ष शरद पवार होतील, असे म्हटले जात आहे. त्यावर “शरद पवारांचे नाव यूपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाहीये”,  अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे त्यांनी दिली.

पुण्यात एका कार्यक्रमात आले असता प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या विधानानंतर जाती-धर्माचे राजकारण बघायला भेटले. त्यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले,जाती धर्माचे राजकारण या देशात चालत नाही, पुन्हा पुन्हा जाती धर्माचे राजकारण करू नये ते चालणार नाही.

दंगली आणि जातीचा काही संबंध नाही

दंगल पेटवणारे ब्राम्हण असतात आणि खाली लढणारे बहुजनांची मुलं हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत असं वादग्रस्त विधान वंचीत बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. त्यावर दंगली आणि जातीचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी सुजात आंबेडकर यांच्या वादग्रस्त विधाना वर केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: