चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या एनएसएफए संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत नाशिकच्या एनएसएफए संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत तनय कुमार(5-8) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर नाशिकच्या एनएसएफए संघाने 22 यार्ड्स क्रिकेट अकादमी संघाचा 73 धावांनी पराभव करत तिसरा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात धीरज गव्हाणे(73धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रिव्होल्युशन स्पोर्ट्स अरेना संघाने फल्लाह क्रिकेट अकादमी संघाचा 49 धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदवला.
निकाल: साखळी फेरी:
एनएसएफए नाशिक: 20षटकात 5बाद 142धावा(नीलकंठ तनपुरे 60(35,6×4,4×6), साई राठोड 29(42), तनय कुमार नाबाद 19, अमन सिंग 18, महेश वाघीरे 1-7, चैतन्य लवाटे 1-22, सागर सिंग 1-37, फैयाझ शेख 1-39)वि.वि.22यार्ड्स क्रिकेट अकादमी: 13.5षटकात सर्वबाद 69धावा(किशन गुर्जर 25(28), योगराज देशमुख 21(12), तनय कुमार 5-8, रोहित भोरे 2-12, नीलकंठ तनपुरे 1-14);सामनावीर-तनय कुमार; एनएसएफए नाशिक संघ 73 धावांनी विजयी;
रिव्होल्युशन स्पोर्ट्स अरेना: 20षटकात 6बाद 182धावा(धीरज गव्हाणे 73(43,8×4,2×6), सुशील जाधव 31(16), पृथ्वीराज पाटील नाबाद 17, ईशान ओसवाल 15, केशव सूर्यवंशी 2-30, यश दुलानी 2-40)वि.वि.फल्लाह क्रिकेट अकादमी: 17.4षटकात सर्वबाद 133धावा(कौशिक चिखलीकर 44(20,3×4,4×6), प्रज्वल घोडके 34(25,6×4), कौस्तुभ रनशूर 13, ऋषिकेश वेलणकर 10, निशांत नगरकर 4-26, पृथ्वीराज पाटील 3-3, अजिंक्य शिंदे 3-31);सामनावीर-धीरज गव्हाणे; रिव्होल्युशन स्पोर्ट्स अरेना संघ 49धावांनी विजयी.

Leave a Reply

%d bloggers like this: