MNS : मी नाराज नाही मी मनसेत राहणार राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं. यादरम्यान, मोरेंना अनेक मोठ्या पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली. मात्र वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केलं. यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली आणि अखेर दोघांची मुंबईत भेट झाली. त्यानंतर वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला .
वसंत मोरे म्हणाले, उद्या मनसेची ठाण्यात उत्तर सभा आहे त्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. साहेबांच्या भेटीवर मी १०० टक्के समाधानी आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो कि मी नाराज नाही मनसेत राहणार आहे. असे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.
