किरीट सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केल्या निधीत घोटाळा केल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई विशेष न्यायालयने फेटाळला आहे. तर नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यां यांच्यावर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: