Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

उद्या मी अपक्ष म्हणून जरी लोकांच्या समोर गेले तरी लोक मला निवडून देतील – वसंत मोरे


पुणे:पक्षाने केलेल्या कारवाईमुळे पुणे मनसेचे वसंत मोरे नाराज झाले आहेत. पाठीमागील 27 वर्षे मी राज ठाकरे आणि पक्षासोबत आहे. या काळात मुस्लिमांशी आपली नाळ जोडली गेली आहे.
27 वर्षे पक्षात सर्वांना सोबत घेऊन काम केले. जे कार्यकर्ते माझ्यासोबत मोठे झाले त्या कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्यात दुफळी निर्माण केली जात आहे. पक्षाच्या निर्णयामुळे काल मला रात्रभर झोप लागली नाही. उद्या मी अपक्ष म्हणून जरी लोकांच्या समोर गेले तरी लोक मला निवडून देतील. पण या लोकांशी असलेले संबंध मी तोडू शकत नाही. असे वसंत मोरे यांनी आज बोलून दाखवले
आता त्यांच्याच दारात जाऊन भोंगे वाजवायचे आणि काहीतरी करायचे का? असा सवाल उपस्थित करत वसंत मोरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला आपण राज ठाकरे यांनाआपण मेसेज केला आहे. परंतू, अद्याप त्यांचा निर्णय आला नाही, असेही त्यांनी सांगितले.
वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे पुण्यातील आणि खास करुन कोंडवा येथील मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. वसंत मोरे यांच्या समर्थनार्थ कात्रज गावठाण येथील कार्यालयाबाहेर मुस्लिम समाजाने सत्याग्रह सुरु केला आहे. वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, राज ठाकरे यांनी भाषण केल्यानंतर मला जी भीती वाटत होती तेच झाले. पाठिमागील अनेक वर्षांपासून मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. साधारण पासून 2007 पासून आम्ही सगळे सोबत काम करतो आहोत. कधीच हिंदू-मुस्लिम असे अंतर त्यात आले नाही. आता नाळ इतकी घट्ट झाल्यानंतर त्यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे का? काहीतरी कारण काडून, भूमिका घेऊन त्यांच्यासोबत वाद करत बसायचे का? हीच भूमिका मी स्पष्टपणे आणि तितक्याच प्रखडपणे मांडली. त्यानंतर ज्याची भीती होती तेच घडले, असे मोरे यांनी बोलून दाखवले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading