Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ST Workers Strike – शरद पवारांच्या घरात घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी केली चप्पल फेक

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईमधील निवासस्थानी बाहेर संपकरी एसटी कामगारांनी (ST Workers Strike) गोंधळ घातला आहे. एसटी कामगारांनी  शरद पवार यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी घुसून चप्पल फेक देखील केली आहे. त्यामुळे हा एसटी कामगारांचा  वाद आता थेट शरद पवार यांच्या घर परिसरात चिघळला असल्याचं दिसत आहे.

एसटी कामगारांनी गेल्या अनेक महिन्यापासून राज्यभर संप केल्याने कोर्टाच्या आदेशाने कालच संप मिटला असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आज (शुक्रवारी) एसटी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. आज थेट शरद पवार यांच्या घरासमोर एसटी कामगारांनी गोंधळ घातला असून आणखी वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याची ग्वाही न्यायालयात दिली आहे. त्यानंतर कोर्टाने 22 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी एसटी कामगारांच्या संप विरोधात एसटी महामंडळाचा अवमान याचिकेवर हाय कोर्टात सुनावणी झाली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading