समाज कल्याण विभागाच्यावतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
पुणे :- ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ निमित्त जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मानवता हाच धर्म माणुसकी हीच जात, महापुरुषांची गाव गाथा आदराने टेकवू माथा, कारोनानंतरची शाळा, माझ्या स्वपनातील भारत या विषयावर निबंध वक्तृत आणि स्पर्धा घेण्यात आली.
जिल्ह्यातील बारामती व तळेगाव दाभाडे, राजगुरूनगर, खडकवासला, भोर खडकवासला, इंदापूर व दिवे येथील निवासी शाळा तसेच वसतिगृहात निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी दिली आहे.