वसंत मोरेंच्या अडचणीत अजून वाढ शहराध्यक्ष पद गेल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांची नोटीस

पुणे: मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना काल मनसेच्या पुणे शहर अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता वसंत मोरे   यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मशिदी बाहेर हनुमान चालीसा न लावण्याची भूमिका घेऊनही मोरेंना पोलिसांनी नोटीस दिली आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असं कृत्य करु नका असे आवाहन नोटीसीमध्ये करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी मशिदी बाहेर भोंगे काढले नाहीतर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसाचे स्पीकर लावा असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यांनतर राज्यातील मुस्लीम समाजात नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी मोरेंना नोटीस पाठवली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटलं आहे.

नोटीस मध्ये म्हटले आहे की,  वसंत कृष्णाजी मोरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, पुणे शहर
आपणांस या नोटीसद्वारे कळवण्यात येते की दिनांक दोन एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला. सरद मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे जर काढले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मशिदीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल असे वक्तव्य केले आहे.आपण व आपल्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वरील वक्तव्याने अनुषंगाने दोन समाजात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करु नये अन्यथा आपणावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करम्यात येईल याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

%d bloggers like this: