मराठी भाषेला “अभिजात दर्जा” मिळावा साठी युवतीसेनेमार्फत राष्ट्रपतींना पत्रे
पुणे:आज पुण्यात युवतीसेनेमार्फत भारताचे राष्ट्रपती महामहिम रामनाथजी कोविंद साहेब यांना पोस्टाने पत्र पाठवण्यात आले. या पत्रात युवतीसेनेने राष्ट्रपतींना मराठी भाषेला “अभिजात” दर्जा द्यावा अशी विनंती केली आहे.
या पत्रात युवती राष्ट्रपतींना सांगत आहेत की, “भारत सरकारने २००४ साली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषा तज्ञांच्या समितीने एकमताने केली आहे. मात्र याला आता सात वर्षे उलटून गेली.साहित्य अकादमीने केलेले ही शिफारस ताबडतोब अमलात येणे गरजेचे आहे.मराठी राज्यभाषा, ज्ञानभाषा , महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. या संदर्भातील अनेक पुरावे यांनी हे शाबित होते की मराठी ही अभिजात भाषा आहेस तरीही कृपया मराठीला तो दर्जा द्यावा अशी आम्ही युवती आपल्याकडे नम्र विनंती करत आहोत.”
यावेळी युवासेनेच्या सहसचिव कु.शर्मिला येवले, निकिता मारटकर, गायत्री गरुड, रेणुका साबळे, वैभवी सूर्यवंशी,निकिता भोसले,सलोनी शिंदे,ममता तांबोळी,नंदिनी लाटे,निकिता लोणार,धनश्री मारटकर,मानसी मारटकर, आर्या आलमखाने,नेहा गुरव आदी युवतीसेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.