सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2022स्पर्धेत अभिराम निलाखे, अंशीत देशपांडे,  अभिलिप्सा मल्लिक, आनंदी भुतडा यांचा अंतिम फेरीत प्रवेश 

कोल्हापूर :  कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन(केएसए) व कोल्हापूर जिल्हा  लॉन टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2022स्पर्धेत मुलांच्या गटात अभिराम निलाखे, अंशीत देशपांडे यांनी तर मुलींच्या गटात  अभिलिप्सा मल्लिक, आनंदी भुतडा  या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.  
 
मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्याअभिराम निलाखे याने औरंगाबादच्या तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफ़ुलेचा 6-3,6-4 असा तर, नाशिकच्या दुसऱ्या मानांकित अंशीत देशपांडेने चौथ्या मानांकित पुण्याच्या विश्वजीत सणसचा 6-2,6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तिसऱ्या मानांकित औरंगाबादच्या शिवतेज शिरफ़ुले याने पुण्याच्या चौथ्या मानांकित विश्वजीत सणसचा 4-1,5-3 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत नवी मुंबईच्या अभिलिप्सा मल्लिक हिने नागपूरच्या सेजल भुतडाचा 4-2, 5-4(3)असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तिसऱ्या मानांकित नवी मुंबईच्या आनंदी भुतडा हिने पुण्याच्या श्रावणी देशमुखचे आव्हान 4-1, 4-2 असे मोडीत काढले.  तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत नागपूरच्या सेजल भुतडा हिने पुण्याच्या श्रावणी देशमुखचा 5-3, 4-2 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
 
निकाल: उपांत्य फेरी: 14 वर्षाखालील मुले: 
अभिराम निलाखे(पुणे)(1) वि.वि.शिवतेज शिरफ़ुले(औरंगाबाद)(3) 6-3,6-4
अंशीत देशपांडे(नाशिक)(2) वि.वि.विश्वजीत सणस(पुणे)(4)6-2,6-1

3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी : शिवतेज शिरफ़ुले(औरंगाबाद)(3)वि.वि.विश्वजीत सणस(पुणे)(4)4-1,5-3

14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी: 
अभिलिप्सा मल्लिक(नवी मुंबई)वि.वि.सेजल भुतडा(नागपूर)4-2, 5-4(3);
आनंदी भुतडा(नवी मुंबई)(3)वि.वि.श्रावणी देशमुख(पुणे)4-1, 4-2.
 3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी : सेजल भुतडा(नागपूर)वि.वि.श्रावणी देशमुख(पुणे) 5-3, 4-2.

Leave a Reply

%d bloggers like this: