‘बोला जयभीम’ कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिली जाणार सुरांची मानवंदना!
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर येत्या रविवारी १० एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘बोला जयभीम’ हा कार्यक्रम सादर होणार . याकार्यक्रमात बाबासाहेबांवरची अनेक गाणी शिंदे घराण्यातले प्रसिद्ध गायक गाणार आहेत. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शिंदे घराण्यातल्या तिन्ही पिढ्या एकाच मंचावर आपली कला सादर करणार आहेत. ज्येष्ठ गायक आनंद शिंदे,सगळ्यांचा लाडका गायक उत्कर्ष शिंदे आणि तिसर्या पिढीतील अल्हाद हर्षद शिंदे असे तीन पिढ्यांतील गायक आपल्या गायनाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारआहेत. शिंदे घराण्याच्या गाण्यांबरोबरच दर्जेदार नृत्यांचे सादरीकरण होणार आहे. मेघा घाडगे, मयुरेश पेम आणि संस्कृती बालगुडे बाबासाहेबांच्या विविध गाण्यांवर नृत्य सादर करणार आहेत. बाबासाहेब आणि त्यांचे कार्य यांचा महिमा आजच्या तरुण पिढीपर्यंत’बोला जयभीम’ या कार्यक्रमातून पोचवण्यात येणार आहे. गाणी, नृत्यं यांच्यामुळेरसिकांना उत्तम कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे.
त्याचबरोबर गायिका कविताराम ‘माझी रमाई’ आणि ‘भीम विक्रमी वीरा’ ही गाणी सादर करणार आहे. प्रसिद्ध गायक नंदेश उमप हे देखील दोन गाणी गाणार असून संतोष पवार आणि नंदेश उमप यांनी ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे.भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दिली जाणारी ही सुरांची मानवंदना नक्की बघा.