मी काही राजकीय भाष्य करणार नाही, मी बोललो तर बातम्यांचा फोकस बदलतो -आदित्य ठाकरे

पुणे : आदित्य ठाकरे सध्या दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. पण आदित्य ठाकरे हे माध्यमांच्या कोणत्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देत नाहीयेत. त्यावर आज पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, मी काही बोललो तर बातम्या बदलतात फोकस बदलतो त्यामुळे मी आज आणि उद्या राजकीय काही बोलणार नाही

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुण्यात पत्रकारांशी बातचीत केली. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले. पुढे बोलताना ते म्हणाले, पुणे हे नेहमी सगळ्याच बाबतीत अग्रेसर राहिले आहे, त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, पुणे नेहमी अग्रेसर राहिलं आहे. काल पुण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पुण्यात मोटर रॅली काढण्यात आली, त्यावर ठाकरे म्हणाले,कालची rally यशस्वी होती.

Leave a Reply

%d bloggers like this: