सेवा निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे उपोषण

पुणे : कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेले माझी कर्मचारी यांचे राज्य सरकारने अजून दर महिन्याला पेन्शन दिले नाही. त्यामुळे विविध कर्मचारी संघटना रोज उपोषण करताना दिसत आहे. त्यात सेवा निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाने उपोषण पुण्यात गुलटेकडी येथे उपोषण केले.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी पेन्शन संघाचे अध्यक्ष दामोदर शिनगारे यांनी या उपोषणाचे नेतृत्वकेले. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी पेंशन संघाचे कार्याध्यक्ष व्यंकटराव अडक, सर सचिव विष्णू दरेकर व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्या मागण्या

  • जुने-नवे पेन्शनरचा भेदभाव व2/2 नीयम संपुष्टात आणण्यात यावेत
  • पती-पत्नीचे पश्चात अंशदान सेवेची रक्कम नवे प्रमाणे जुने पेन्शनर यांनाही मिळावी
  • पेन्शन योजना व सेवेतील सभासदांचे सक्षमिकरनासाठी भ. नि. नि चा दर 15 टक्के प्रमाणे करण्यात यावा
  • वेळोवेळी दिलेल्या लेखी तोंडी आश्वासन प्रमाणे सहाशे रुपये तसेच 25 टक्के तसेच पाच टक्के पाच वाट फरकास देण्यात यावी
  • अल्प स्पेशनरचे उपजिविकेसाठी किमान पेन्शन रुपये 6000 ची मर्यादा ठरवावी
  • मयत सभासद यांना रुपये पन्नास हजाराचे सानुग्रह अनुदान दिले व जीवन पेन्शन यांना मुद्दामून वंचित ठेवले
  • बँक बुडी ठेव मयत पेन्शनर ठेव हडप इत्यादी गुन्हे स्वरूप चुका पाठीशी घालणारा पर सेवेतील मुख्याधिकारी नको

Leave a Reply

%d bloggers like this: