Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सद््गुरु श्री जंगली महाराज १३२ व्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात 

पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३२ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. जंगली महाराज रस्त्यावरील मंदिरात उत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त मंदिरात आणि समाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. शुक्रवार दिं. १५ एप्रिल पर्यंत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.
सकाळी ६ वाजता शंकरराव आढाव बंधू यांचे सनईवादन झाले त्यानंतर  समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, भजन आणि आरती झाली. सद्गुरु श्री जंगली महाराज भजनी मंडळ भजन सादर केले. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading