fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्याच्या रेडिरेकनर दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

पुणे : पुण्याच्या रेडिरेकनर दरात सरासरी 6.12 टक्के वाढ करण्यात आली आहे. मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्याची मुंबई वगळता 5 टक्के इतकी रेडरेकनर दरात वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात 6.96 टक्के वाढ झाली आहे. या रेडिरेकनर दरामुळे नागरिकांना काही प्रमाणात तरी घर घेताना महागाईला सामोरे जावे लागणार, हे यातून स्पष्ट होत आहे.

पुण्यात सरासरी वाढ 6.12 टक्के, तर पुणे शहरात समाविष्ट 23 गावे 10.15 टक्के वाढ, पिंपरी चिंचवड शहरात 12.36 टक्के वाढ करण्यात आली आहे. यावेळी श्रावण हर्डीकर म्हणाले की, ग्रामीण भागात उपलब्ध खरेदी, विक्री व्यवहाराचा कल, परिसरात झालेला विकास, भूखंड विक्रीच्या जाहिराती, रिअल इस्टेट, वेबसाईट वरील माहिती इत्यादीच्या आधारे माहिती घेऊन सर्वसाधारण वाढ प्रस्तावित केलेली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading