fbpx

कॉँग्रेसचे आमदार नाराज नाहीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दावा

पुणे:काँग्रेस पक्षातील काही आमदार नाराज आहेत ते सोनिया गांधी यांची लवकर भेटणार आहेत अशी काही चर्चा रंगू लागली आहे त्यावर काँग्रेस पक्षातील काही आमदार हे नाराज नाहीत त्यांना फक्त सोनिया गांधी यांची भेट घ्यायची आहे त्यामुळे ते दिल्लीला जाणार आहेत. असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे महागाई मुक्त भारत” आंदोलन करण्यात आले त्यावेळी   त्यांनी उपस्थिती लावली त्यावेळी ते बोलत होते . हे महागाई मुक्त भारत आंदोलन पुण्यातील अलका चौक येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले.
या महागाई मुक्त भारत आंदोलनाला पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे , आमदार संग्राम थोपटे माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा  तिवारी, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पूजा आनंद माजी महापौर कमल व्यवहारे ,नगरसेवक आबा बागुल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले ,केंद्रातील फेकू सरकार, लोकांची लूटमार करणारे सरकार याकेंद्र सरकारने 2014 साली सत्तेत आल्यानंतर आम्ही महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. पण आता पाच -सहा वर्ष झाले तरी या मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी केले नाहीत. यामुळे काँग्रेस पक्ष हा आक्रमक झाला आहे  पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे महागाई मुक्त भारत” आंदोलन करण्यात येत आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणा महाविकास आघाडीच्या सरकार आपल्या मंत्र्यांवर कारवाई करत आहेत. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, या केंद्र सरकारला मधल्या मंत्र्यांवर कारवाई करून त्यांना अटकेत ठेवून त्यांना महाराष्ट्र मध्ये पत्ता आणायचे आहे म्हणून ते सारखे ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महा विकास आघडी मधल्या मंत्र्यांवर कारवाई करत आहेत. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. आईने ते ते भाजपविरोधी सारखे बोलत होते म्हणून त्यांच्यावर कारवाई केली असे म्हणत आहेत त्यावर थोरात म्हणाले जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल .त्यांची लवकरात लवकर सुटका होईल .असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: