चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत द गेम चार्जर्स, क्रिकेट ब्लास्टर्स संघांची विजयी सलामी

 
पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत द गेम चेंजर्स, क्रिकेट ब्लास्टर्स या संघांनी अनुक्रमे पुणे पोलीस व क्रिकेट नेक्स्ट अकादमी ब संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
 
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत देवदत्त नातू(83धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर द गेम चेंजर्स संघाने पुणे पोलीस संघाचा ब39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना द गेम चेंजर्स संघाने 20षटकात 3बाद 213धावाचे आव्हान उभे केले. यात देवदत्त नातूने 39चेंडूत 10चौकार व 4षटकाराच्या मदतीने 83 धावांची खेळी केली. त्यानंतर अझीम काझीने 43 चेंडूत 6चौकार व 4षटकाराच्या मदतीने नाबाद 68 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. अझीमला युवराज झगडेने 24धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 36 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली.  याच्या उत्तरात पुणे पोलीस संघाला 20षटकात 7बाद 174धावाच करता आल्या. यामध्ये अनिश पालेशा नाबाद 73, अमोल पायगुडे 35 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. द गेम चेंजर्स संघाकडून शुभम मेड(3-22), नौशाद शेख(2-36) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामनावीर देवदत्त नातू ठरला. 
 
दुसऱ्या सामन्यात श्रेयस महाजन(59धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर क्रिकेट ब्लास्टर्स संघाने क्रिकेट नेक्स्ट अकादमी ब संघाचा 2 गडी राखून पराभव केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: