fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

S. Balan Trophy – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गेमचेंजर्स इलेव्हन संघांचा विजयी चौकार !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि गेमचेंजर्स इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत विजयांचा चौकार मारला.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत रोहीत करंजकर याच्या खेळीमुळे केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाने ओंकार खाटपे याच्या ८३ धावांच्या जोरावर १८ षटकात ७ गडी गमावून १३७ धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने १५.३ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये विशाल भिलारे याने नाबाद ५० धावांची खेळी केली. रोहीत करंजकर (नाबाद ४१ धावा) आणि मंदार भंडारी (३१ धावा) यांनीही छोट्या खेळी करत संघाचा विजय सोपा केला.

तुशार श्रीवास्तव याच्या अर्धशतकी खेळीमुळे गेमचेंजर्स इलेव्हन संघाने जिनवानी इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जिनवानी इलेव्हन संघाने नितीश सप्रे (नाबाद ६३ धावा), हिमांशु अगरवाल (२३ धावा) आणि सौरभ जळगांवकर (नाबाद ३६ धावा) यांच्या खेळीमुळे २० षटकात १ गडी गमावून १४० धावा धावफलकावर लावल्या. गेमचेंजर्स इलेव्हन संघाने हे आव्हान १६.२ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. तुशार श्रीवास्तव (५५ धावा), रोहन दामले (२९ धावा) आणि नौशाद शेख (२८ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाचा विजय सोपा झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading