क्रिसिलतर्फे गुडलक इंडियाच्या श्रेणीत सुधारणा

पुणे : गुडलक इंडिया लिमिटेट या भारतातील आघाडीच्या फोर्जिंग फॉर डिफेन्स अँड एरोस्पेस, अभियांत्रिकी संरचना, प्रेसिजन/ऑटो ट्यूब्स, सीआर उत्पादने आणि जीआय पाईप्सचे उत्पादक असलेल्या कंपनीला क्रिसिल या रेटिंग आधारित कंपनीकडून (सीआरआयएसआयएल) गुडलकच्या बँक कर्ज सुविधांवर अपग्रेड क्रेडिट रेटिंग देण्यात आले आहे. क्रिसिलने कंपनीचे दीर्घकालीन रेटिंग असलेल्या बी बी /पॉझिटिव्ह वरून ए-/स्टेबल आणि अल्पकालीन रेटिंग ए३ प्लस वरून ए२ प्लसवर नेत आपल्या श्रेणीत सुधारणा केली आहे. या रेटिंगमधील बदल गुडलकच्या व्यवसाय आणि आर्थिक प्रोफाइलमध्ये चांगल्या सुधारणा दर्शवित आहे.

ऑपरेशन्सच्या स्केलमध्ये झालेली मोठ्या प्रमामातील वाढ, सातत्याने येत असलेल्या ऑर्डर आणि शाश्वत ऑपरेटिंग मार्जिनद्वारे कंपनीच्या सुधारणेस वाव मिळत आहे.हे रेटिंग एजन्सींमध्ये एक बेंचमार्क आहे आणि सर्व बाजारपेठांमध्ये त्याचा आदर केला जातो. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी आणि विस्तार योजनांसाठी ही बाबत अत्यंत उपयुक्त आहे. या श्रेणामुळे कंपनीला नवीन उंची गाठण्यास मदत होणार आहे .

गुडलक इंडिया लि.चे अध्यक्ष एम.सी. गर्ग म्हणाले की, क्रिसिलने आमच्या बँक कर्ज सुविधांसाठी त्यांचे क्रेडिट रेटिंग अपग्रेड केले आहे, मला हे सांगताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आमचे दीर्घकालीन रेटिंग बीबी /पॉझिटिव्ह वरून ए -/स्टेबल आणि अल्पकालीन रेटिंग ए ३ प्लस वरून ए २ प्लस वर पोहचले आहे. आमच्या क्रेडिट रेटिंगमधील ही सुधारणा कामकाजाच्या वाढीवर आधारित आहे. क्रिसिल कडून चांगले रेटिंग मिळाल्याचा अभिमान आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: