Big Breaking – मास्क मुक्ती मिळालेले पुणेकर हेल्मेट सक्तीत अडकले

पुणे : तब्बल 736 दिवसांनंतर महाराष्ट्रातील नागरिकांची कोरोनाच्या सर्व निर्बंधातून सुटका झाली आहे. मात्र हा दिलासा पुणेकरांसाठी फार काळ टिकला नाही. कारण राज्य सरकारच्या या निर्णयानंतर काही तासांतच मास्क मुक्ती मिळालेले पुणेकर हेल्मेट सक्तीत अडकले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू असणार आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.   

कार चालकांच्या तुलनेत दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू होण्याचा धोका सातपट जास्त आहे. रस्ते अपघातात 62 टक्के लोकांचा मृत्यू हा डोक्याला इजा झाल्यामुळे होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज (दि.31) हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: