Pune Gas cylinder Blast : गंधर्व लॉन्सजवळ एका पाठोपाठ एक 20 गॅस सिलेंडरचे स्फोट

Pune Gas cylinder Blast : कात्रज येथील गंधर्व लॉन्सजवळ सुंदा माता मंदिराच्या परिसरात आज दुपारी एका पाठोपाठ एक अश्या 20 गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याचा भयानक प्रकार घडला. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटची तीव्रता इतकी होती की या आगनितांडवात जवपासच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या प्रार्थमिक माहिती नुसार, मुंबई- बंगलोर हायवे जवळ कात्रज येथे गंधर्व लॉन्सजवळ व सुंदा माता मंदिराच्या परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे 100 गॅस सिलेंडरचा अनधिकृतपणे  साठा करून ठेवलेला होता. नागरिकांच्या सांगण्यानुसार काही दिवसांपासून येथे गॅस सिलेंडरची विक्रीही सुरू होती होती. आज दुपारी अचानक साडेचारच्या सुमारास पाठोपाठ एक अश्या 20 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. त्यावेळी हवेत निघणारे आगीचे लोळ लांबूनही स्पष्ट दिसत होते. त्यामुळे  स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप स्‍फोटाचे कारण समजू शकले नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: