Tuesday, October 6, 2026
Latest NewsPUNE

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्मित रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या वतीने एक वही एक पेन अभियान

पुणे :  भारतरत्न, ज्ञानसूर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वि जयंती येत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिम्मित दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत बाबासाहेबांना अपेक्षित अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी ” एक वही एक पेन ” हे अभियान राबवण्यात येणार आहे.

डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर यांचा व्यक्तिपूजेला विरोध होता. बाबासाहेब म्हणायचे तुमच्याकडे जर २ रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्या व १ रुपयाचे पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल व पुस्तक तुम्हाला कस जगायचे यासाठी मदत करेल. यावरून आपल्या लक्षात येते कि बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला किती महत्व देत असत. बाबासाहेबांच्या याच्या विचारांचा आदर्श घेत रयत विद्यार्थी विचार मंच संस्था पिंपरी चिंचवड शहरात व महाराष्ट्रात गेली ५ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे.

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवले जातात.वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर,प्रदेश महासचिव संतोष शिंदे ,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते कि आपण डॉ.बाबासाहेब जयंतीला हार,फुल अर्पण करण्यापेक्षा त्यावेजी एक वही एकी पेन अर्पण करावे. जमा झालेले पिंपरी चिंचवड शहरातील शैक्षणिक साहित्य गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल. तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिद्धी देण्यात यावी हि आपणास नम्र विनंती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading