Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण : पुढील सुनावणी येत्या 12 एप्रिलला

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नरेंद्र दाभोळकर यांच्या गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली असून न्यायालयात प्रत्यक्षदर्शीने दोन्ही आरोपींना ओळखल आहे. आज सुनावणी दरम्यान साक्षीदारांची उलट तपासणी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आता निर्णयाक वळण मिळाले आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 12 एप्रिलला होणार आहे. 

पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या किरण केशव कांबळे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. सचिन अंदूरे आणि शरद कळसकर अशी साक्षीदाराने ओळखलेल्या आरोपींची नावे आहे. पुणे विशेष न्यायालयासमोर दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. यावेळी सीबीआयचे अधिकारीही हजर होते. किरण कांबळे यांनी फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखले आहे. या हत्येप्रकरणात सीबीआयनं सचिन अंदुरे याला औरंगाबादमधून अटक केलेली.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या करण्यात आली होती. ६७ वर्षीय डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतलेलं होतं. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही स्थापन केली होती. दरम्यान,  २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉक करत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आतापर्यंत ५ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading