Monday, October 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

दिलासादायक : पुणे शहरातील आजची कोरोना रुग्ण संख्या केवळ हाताच्या बोटांवर मोजता येणारी 

पुणे : पुणेकरांसाठी आज एक दिलासादायकबाबक बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून पुणे शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. आज तर पुणे शाहरातील कोरोना रुग्ण संख्या केवळ हाताच्या बोटांवर मोजता येणारी आहे. आज दिवसभरात पुणे शहरात केवळ 8 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या 24 तासात पुण्यात एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

 पुणे शहरात आजपर्यंतची कोरोना रुग्ण संख्या 6 लाख 61 हजार 855 इतकी झाली आहे. यापैकी  6 लाख 52 हजार 408 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत पुणे शहरात 9349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 98 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1993 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading