बांग्लादेशात लोकशाही स्थापित करण्याचे काम बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी केले – चिरंजीब सरकार

पुणे : बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यानंतर बांग्लादेशात लोकशाही स्थापित करण्याचे काम करण्याबरोबरच देशाच्या प्रगतीसाठी मोठी कामगिरी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी केली असल्याचे मत बांग्लादेशाचे मुंबई येथील उप उच्च आयुक्त चिरंजीब सरकार यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय केंद्र, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, डेप्युटी हाय कमिशन ऑफ पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेश आणि स्ट्रॅटेजीक कल्चर अँड सेक्युरिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय क्षेत्र आणि बांग्लादेशात बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे योगदान या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या परिसंवादाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आदी उपस्थित होते.

यावेळी भूषण गोखले यांनी 1971 च्या युद्धाच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले युध्द ही न संपणारी असतात त्यामुळेच ती होऊच नयेत यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावेत असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. खरे यांनी विद्यापीठात १५० हुन अधिक विद्यार्थी हे बांग्लादेशचे असल्याचे सांगितले. यावेळी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कार्याविषयी एक माहितीपटही दाखवण्यात आला.

आपली लोकशाहीची मूल्ये राखून काम करावे

“बांग्लादेश आणि भारत हे दोन्ही देश हे लोकशाहीवर आधारलेले देश आहेत. अशा चर्चा आणि परिसंवादातून पुढील पिढीनेही आपली लोकशाहीची मूल्ये राखून काम करावे अशी प्रेरणा मिळेल. दोन्ही देश भविष्यात दारिद्र्य, दहशतवाद आणि वातावरण बदल या प्रश्नांवर मिळून काम करतील अशी आशा आहे.”

– डॉ. एन.एस.उमराणी  (प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Leave a Reply

%d bloggers like this: