42 व्या पीएसपीबी आंतर युनिट गोल्फ स्पर्धेत ओआयएल संघाला सांघिक विजेतेपद

पुणे : ऑईल इंडिया लिमिटेड(ओआयएल) अ संघाने पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड(पीएसपीबी)यांच्या तर्फे आयोजित 42व्या पीएसपीबी आंतर युनिट गोल्फ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पुना गोल्फ कोर्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी पार पडली.
हरिमोहन सिंग, मिलिंद सोनी, अनंत अहलावत, रणबीर चौधरी आणि सुखमन सिंग यांचा समावेश असलेल्या ओआयएल संघाने सलग तीन दिवस सातत्यपूर्ण कामगिरी करताना आपल्या संघाला प्रतिष्टेचा करंडक मिळवून दिला. गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड(गेल)यांनी पीएसपीबीच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
व्यवस्थापक एमपी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ओआयएल अ संघाने आपल्याच ओआयएल ब संघावर निर्णायक आघाडी घेताना विजेतेपदाची निश्चिती केली. ओआयएल अ संघाने 214 गुण, तर ओआयएल ब संघाने 233गुण मिळवले. आयओसीएल अ संघाने 234 गुणांसह तिसऱ्या क्रमांकाची निश्चिती केली.
याशिवाय नेट सांघिक स्पर्धेत बीपीसीएल ब संघाने 220 गुणांची नोंद करताना अव्वल स्थान राखले. आसाम ऑईल डिव्हिजन(एओडी) आणि एचपीसीएल अ यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:
सांघिक स्पर्धा विजेते: ऑईल इंडिया लिमिटेड(ओआयएल) अ संघ(हरिमोहन सिंग, मिलिंद सोनी, अनंत अहलावत, रणबीर चौधरी व सुखमन सिंग, व्यवस्थापक एमपी सिंग);
स्किल किल पारितोषिके:
1.पटींग स्पर्धा: विजेते: संजय मल्होत्रा(एचपीसीएल)
2. बेस्ट अव्हरेज बंकर शॉट: विजेते: गिरीश कुमार(आयओसीएल-एओडी);
3. बेस्ट बंकर शॉट: विजेते: शुभंकर(बीपीसीएल);
4.बेस्ट ऍव्हरेज पिचिंग शॉट: विजेते: गिरीश कुमार(आयओसीएल-एओडी);
5.बेस्ट पिचिंग शॉट: विजेते: गिरीश कुमार(आयओसीएल एओडी);
6.लाँगेस्ट अव्हरेज ड्राईव्ह: विजेते: सुखमन सिंग(296.5यार्ड);
7. लाँगेस्ट ड्राईव्ह: विजेते: हरिमोहन सिंग(317यार्ड);
8. पीएसपीबी प्रेसिडेंट ट्रॉफी: विजेते: राजीव ऐलावाडी(सीपीसीएल) 108+107=215;
उपविजेता: एच शंकर(सीपीसीएल) 121+110=231
9. गोहेन ट्रॉफी(19 ते 24 हँडीकॅप गट):  विजेते: विनयकुमार सिन्हा(एचपीसीएल) 65+63=128;
10. बेस्ट नेट ओव्हर 18 होल्स: विजेते: मेजर एस करजगी(बीपीसीएल) एकूण 62;
11. एसएम भट ट्रॉफी(नेट स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी): विजेते: सिमरजीत सिंग(ओआयएल) 69+69=138;
12. स्टेबल फोर्ड स्पर्धा: विजेते: हरिमोहन सिंग(ओआयएल) व अनुपम तालुकदार(एओडी) 42 गुण;
उपविजेते: संदीप देब(आयओसीएल) व मिलिंद सोनी(ओआयएल) 40 गुण;
13.सर्वोत्तम महिला खेळाडू: सबिना चौधरी(आयओसीएल);
14. 18 होल्स फेरीतील सर्वोत्तम कामगिरी: हरिमोहन सिंग(ओआयएल) 69-2अंडर
15. सर्वोत्तम पुरुष खेळाडू(सलग दोन दिवसातील कामगिरी): विजेते: हरिमोहन सिंग(ओआयएल) 69+71-2अंडर.

Leave a Reply

%d bloggers like this: