Friday, June 5, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

पेट्रोल- डिझेल दरात वाढ : मागील 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागले

नवी दिल्ली : इंधन दरात मागील 7 दिवसांत सहावी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल 30 तर डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम किमतींवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज म्हणजेच, 28 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. ही वाढ गेल्या 7 दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) 6 वेळा वाढल्या आहेत.

सोमवार 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली असून, त्यानंतर एक दिवस वगळता दररोज काही ना काही दरांत वाढ होत आहे. 28 मार्चच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागलं आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी वाढलं आहे. वाढलेल्या दरांनुसार, आता पेट्रोल 114.18 रुपये तर डिझेल 98.46 रुपयांवर पोहोचलं आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आता 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यानंतर पेट्रोलचा दर 99.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 90.77 रुपये प्रति लिटर असेल. तसेच, चेन्नईमध्ये पेट्रोल 105.18 रुपये, तर डिझेल 95.33 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये आता तुम्हाला पेट्रोलसाठी 108.81 रुपये मोजावे लागतील, तर डिझेलसाठी 93.90 रुपये मोजावे लागतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading