मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे – शरद पवार
पुणे: कश्मीर फाईल सिनेमा वरून राज्यात महा विकास आघाडी व भाजप मध्ये चांगले राजकारण बघायला भेटले. याचे पडसाद झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बघायला भेटले. त्यावर विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु, टीका करताना त्यात उद्वेष नसायाला हवा. मात्र अलीकडे ते पाहायला मिळत आहे. राजकारण चुकीच्या दिशेला जातंय की काय? असं वाटत आहे. काश्मिरमधील एक घटक निघून गेला. त्यावर एक सिनेमा आला, त्यानंतर काँग्रेसवर टीका झाली. परंतु यामुळे मन जोडण्याऐवजी मन तोडण्याचं काम झालं, समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते. पंतप्रधानांकडून त्यावर भाष्य केले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका टिप्पन्नी केली जाते. मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केले.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे ,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, रामराजे निंबाळकर , जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला फक्त स्वातंत्र्य दिले नाही तर देशाला दिशा दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देशाला महत्व प्राप्त करून देण्याचं काम केलं. आज आपल्याला देशाला एकसंघ ठेवायचं आहे, असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
आज-काल विरोधक सरकारवर सारख्या टीकाच करत असतात .त्यावर शरद पवार म्हणाले,विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे.मात्र टीका द्वेष नसायला हवा मात्र अलीकडे ते पाहायला मिळते. राजकारण चुकीच्या दिशेला जातं का?असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे म्हणाले.
