Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 21 कोरोना रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये  कोरोनाचे  रुग्ण  रोज कमी  सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या   खुप कमी आढळुन आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी  होत आहे.  त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 21नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 840इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 52 हजार 376  रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात 0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 115 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1695 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading