बेकायदेशीर कामावर आधीही कारवाया होतच होत्या पण आधी इतका गाजावाजा नव्हता – छगन भुजबळ यांचा किरीट सोमय्या यांना टोला

पुणे : शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब याच्या दापोली येथील हॉटेलवर हातोडा मारण्यासाठी काल भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दापोलित आले होते. त्याना पोलिसानी अटक केली.अन् मुंबईला परत पाठवले किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घाणेरडे आरोप केले. त्यावर त्याना आरोप करायचे ते करू द्यात तक्रार करायची ती करु द्या. कुठल्याही बेकायदेशीर वास्तूंवर, कामांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहेत ना? तरीही न्याय मिळाला नाही तर कोर्ट आहे ना? आधीही बेकायदेशीर कामावर कारवाया होतच होत्या पण आधी इतका गाजावाजा नव्हता, असे बोलत अन्न व पाणी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

राजकारण राजकारणाच्या ठिकाणीच राहू द्यात

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे उद्घाटन शरद पवारांनी करू नये, असे म्हटले होते. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, पवार साहेबांवर अशा प्रकारचे आरोप का करावेत हे कळत नाही. फुले, शाहू, आंबेडकर, यांच्या विचारानेच जात त्यांनी काम केले आहे. त्यांचे घरचे वातावरण पुरोगामी आहेत. आतापर्यंत सर्व समाजाला बरोबर घेऊन ते जाताहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्यात, असे छगन भुजबळ गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर म्हणाले.

दूसरा आयोग ओबीसी आरक्षणाचे काम करेल 

मागासवर्गीय आयोगाने ओबीसी आरक्षण आरक्षणाचा अहवाल रखडला आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, मागासवर्गीय आयोगाने जे रिपोर्ट दिले होते तेच सुप्रीम कोर्टाने फेटाळले. सुप्रीम कोर्टाला अभिप्रेत असलेला अहवाल आहे तो देण्यात आम्हाला यश येईल. दुसरा आयोग नेमलेला आहे तो ओबीसी आरक्षणाचे काम करेल. आधीचा आयोग बरखास्त करायचे की नाही हे राज्य सरकार ठरवेल,  असे छगन भुजबळ म्हणाले.

ईडी सारख्या महाविकास आघाडी मधल्या मंत्र्यांवर कारवाई करत आहे. त्यावर भुजबळ म्हणाले, या यंत्रणांचा वापर राजकीय हेतूने आणि राजकीय लोकांना संपवण्यासाठी करु नये असं वाटतं.

Leave a Reply

%d bloggers like this: