fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एसटी कर्मचारी 31 मार्च पर्यंत कामावर आले नाही तर कठोर कारवाई करणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : एसटीचा प्रश्न आता सुटलेला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सदनात माहिती दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यांना पगारवाढ केली आहे. पगार वेळेत होणार, याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. ३१ मार्च पर्यंत जर कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही, तर जे कामावर येणार नाहीत. त्याच्यावर कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकाराशी बोलताना दिला आहे.

कालच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. त्यावर अजित पवार म्हणाले ,तुम्हाला अर्थसंकल्पातून विकासाबद्गल सांगतो.खूप काही अधिवेशनाच्या आधी बोललं गेलं होते. विरोधक सारखे सरकार पडणार सरकार पडणार अशी टीका सरकार वर करत आहे ,त्यावर पवार म्हणाले जोपर्यंत सोनिया गांधी- शरद पवार आणि ठाकरेंनी ठरवलेलं आहे तोवर या सरकारला काही होणार नाही. असे पवार म्हणाले.
पुण्यात गुन्हेगारी ही वाढत आहे . त्यावर मी पुण्यातल्या घटनाबाबत वळसे पाटिल यांच्याशी चर्चा केली. आम्ही पोलिसांच्या अडचणी सोडवतोय तर त्यांनी कायदा सुव्यवस्था चोख ठेवली पाहीजे. प्रत्येकाला वागत असताना सुरक्षित वाटलं पाहीजे, आज मी अभिनव देशमुखांना देखील सांगितलं सीपींशी बोलणार आहे. 
आरोग्य भरती चा घोटाळा बद्दल अजित पवार म्हणाले,मेरीटचे मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. कंपनीतले लोक दोषी. पोलिसांनी सांगितलं की घोटाळा तर नव्याने ही भरती करण्याचा निर्णय घेणार.

२०१६ मध्ये बिबट्याच्या सफारीचा प्रकल्प होणार होता तो बंद झाला होता. अतुल बेनकेंनी त्याबाबत चर्चा केली. कारण नसताना राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंनी ठरवलं आहे. बिबट्या सफारीच्या दृष्टीने कोणेत स्पॅाट याची पहाणी झाली. निर्णय घेऊ। असे पवार म्हणाले.

आगाखान पॅलेस येथील पाणी पुणे महानगरपालिकेने बंद केले त्यावर पवार म्हणाले मी विक्रमकुमारांकडून माहिती घेतो. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुर्चीक,यांच्या प्रकरणावर अजित पवार यांनी भाष्य केले.कोणताही पक्ष असू द्या .आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्याने इतकी विकृती दाखवून समाजात खालच्या पातऌीवर जाऊ नये. असं आढळलं तर पक्ष कारवाई करतो. पण कारवाई करताना पुरावे गोळा करण्याचं काम सुरु. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading