संबंधीत शाळेचे संस्थाचालक व प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल करावा- राष्ट्रवादी युवती काँग्रेस

अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून निषेध

पुणे : शिवाजीनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व मुलींच्या सुरक्षेत दिरंगाई करणाऱ्या संस्थाचालक व प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली. 

हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात झाले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते, उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे, श्वेता मिस्त्री, अमृता थोरात, वेणू शिंदे, सानिया झुंजारराव आदी उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असून, या शाळेमध्ये घडलेला प्रकार खरोखर दुर्दैवी आहे. भरमसाठ फी घेऊन जर आमच्या लेकी – बाळी शाळेमध्ये सुरक्षित नसतील, तर मुलींना शिक्षणासाठी पाठवायचे कुठे..? आरोपीला अटक करून हे प्रकार थांबणार नाहीत. या घटनेतील शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्या हलगर्जीपणा बाबत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांना करण्यात आली. जर येत्या काही दिवसात पोलीस प्रशासनाने संबंधित शाळेवर कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: