लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मराठी चित्रपट ” अदृश्य ” चे पोस्टर अनावरण

बॉलिवूड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा ‘अदृश्य’ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .

‘अदृश्य’ चित्रपटात पुष्कर जोग , मंजिरी फडणीस ,अनंत जोग , उषा नाडकर्णी ,अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत .

‘अदृश्य’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत शाहिद लाल यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे . चित्रपटाचे संकलन संजय इंगळे यांनी केले आहे आणि संवाद निखिल कटरे व चेतन किंजाळकर यांनी लिहिले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: