जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाका बंद करा – विवेक वेलणकर

मावळ : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाक्यावर बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जाते. केंद्र आणि राज्य शासनाची टोल वसुली कधीच संपली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्या प्रमाणे ६० किलोमीटरच्या आत संबंधित टोलनाका येतो. त्यामुळं हा टोलनाका बंद करायला हवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

या पत्रकार परिषदेला जनविकास विकास समितीचे किशोर आवारेंसह कार्यकर्ते उपस्थित हाेते. दरम्यान टोल नाका बंद न झाल्यास आगामी काळात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाईल असा इशारा समितीने दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, परवा नितीन गडकरी यांनी सांगितलं की ६० किलोमीटरच्या आत दुसरा टोलनाका नसावा. हा नियम इथे लागू होतो. २००४ मध्ये देखील १९९७ च्या धोरणानुसार ८० किलोमीटरच्या आत टोल नसला पाहीजे होता. मात्र ६० आणि ८० किलोमीटरमध्ये हा टोलनाका येत असताना देखील तो बेकायदेशीरपणे सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. आतातरी हा टोलनाका बंद करावा अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: