Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांकरिता उर्वरित निधी मार्चनंतर 

मुंबई : तौक्ते चक्रीवादळात कोकणाचे फार नुकसान झाले असून रायगड जिल्ह्यातील 492 जिल्हा परिषद शाळाच्या इमारत दुरुस्तीसाठी 738 लाख रूपये इतका निधी मंजूर केला गेला आहे. त्याचप्रमाणे तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यांकरिता मालमत्ता दुरुस्तीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 664.99 लाख इतका निधी राज्य कार्यकारी समितीने मंजूर केला आहे. याकरिता निकषात बसणारी सर्व मदत प्रकल्पग्रस्तांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित निधी मार्चनंतर देण्यात येईल. याकरिता केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ हे २०२१मध्ये महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर धडकले होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading