Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRA

यवतमाळ जिल्हा बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारींची विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी 

मुंबई : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारीबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

पाटील म्हणाले की, पाटण शाखेच्या व्यवस्थापकांनी १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवहाराची सादर केलेली  माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती यामध्ये तफावत आढळल्याने बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पाटण शाखेला भेट देऊन अहवाल बॅंकेला सादर केला. या शाखेत अनियमितता आढळल्याचे अहवालात निदर्शनास आल्याने बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांची बदली करण्यात आली तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या पत्राच्या अनुषंगाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून संबंधित शाखा व्यवस्थापकाला बॅंकेने निलंबित केले आहे, असे सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले.

फोटो – संग्रही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading