बाहा एसएई इंडिया २०२२ च्या १५व्या प्रत्यक्ष फेरीस सुरुवात

पुणे : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बहुप्रतीक्षित ‘बाहा एसएईइंडिया’ या मालिकेतील १५व्या सत्राच्या प्रत्यक्ष फेरीला प्रारंभ करण्यात आला असल्याची घोषणा एसएईइंडिया या सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे करण्यात आली.

१८५ महाविद्यालयांमधून २०३ प्रवेशिकांसह हा कार्यक्रम आभासी व्यासपीठावर (व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म)सुरू झाला. व्हर्च्युअल कार्यक्रम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाला. २०३ संघांपैकी भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील १२७ संघ अंतिम स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेण्यासाठी रिंगणात आहेत. पारंपरिक m-BAJA साठी १२७ पैकी ८१ संघांनी आणि e-BAJA कार्यक्रमांसाठी ४६ संघांनी १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून नोंदणी केली. ‘बाहा एसएईइंडिया’तर्फे या सहभागी विद्यार्थ्यांना एक सिंगल-सीटर, कोणत्याही पृष्ठभागावर धावू शकणारी (ऑल-टेरेन व्हेईकल – एटीव्ही) चारचाकी गाडी बनविण्यास सांगितले जाते. या गाडीचे डिझाईन, तिची बांधणी, तिच्या चाचण्या व मंजुरी या संकल्पना या विद्यार्थ्यांनीच राबवायच्या असतात. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम तीन टप्प्यांत पार पडला असून सहभागी संघांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आभासी म्हणजेच व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होण्याची मुभा होती तर तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी आहे.

सप्टेंबरमध्ये प्राथमिक फेरी आणि डिसेंबर २०२१ मध्ये व्हर्च्युअल फेरी यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रत्यक्ष फेरी दोन ठिकाणी जोरात सुरू होणार आहे: mBAJA साठी इंदूरजवळील पिथमपूर NATRAX येथे ६ ते १० एप्रिल २०२२ दरम्यान आणि बंगळुरू येथे eBAJA साठी केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगळुरू येथे ५ ते ८ मे २०२२ दरम्यान होणार आहे.   सध्याच्या महामारीच्या आव्हानांचा स्वीकार करून आणि सहभागी सर्व भागधारकांच्या आरोग्यविषयक चिंता लक्षात घेऊन सहभागी प्रत्येक संघाची सदस्यसंख्या १५ पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझेशन सुविधा आणि सुरक्षित अंतर राखणे या गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतल्या जात आहेत.

पाच दिवसीय कार्यक्रमात सहभागी संघांच्या प्रत्यक्ष ATVS ची तांत्रिक तपासणी केली जाईल. त्यानंतर ब्रेक, प्रवेग, ड्रॉ पुल, सस्पेंशन आणि ट्रॅक्शन, मॅनोयुव्हरेबिलिटी आणि ऑल-टेरेन परफॉर्मन्स यासारख्या डायनॅमिक इव्हेंट्सची तपासणी होईल. गो-ग्रीन इव्हेंट आणि स्थिर कार्यक्रमांची अंतिम फेरी: सीएई, डिझाइन आणि खर्च समांतरपणे होतील. अंतिम दिवशी संघांमध्ये सर्व गोष्टींची कसोटी बघणारी ४ तासांची प्रदीर्घ स्पर्धा होईल आणि त्यानंतर निरोप समारंभ होईल.

बाहा एसएईइंडिया आयोजन समितीचे अध्यक्ष आणि COEP भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप अँड लीडरशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के.सी. व्होरा म्हणाले, ” बाहा एसएईइंडिया हे स्टीम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित) तत्त्वाखालील वर्गबाह्य शिक्षण आहे आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित शिक्षणाची संधी प्रदान करते. जिंकण्यापेक्षा हा एक शिकण्याचा कार्यक्रम आहे आणि बाहा एसएईइंडिया मधील स्पर्धात्मक वातावरण नेहमीच शिकण्याला अग्रस्थानी ठेवते आणि उद्योगाच्या स्पर्धात्मक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या वाढीस प्रोत्साहन देते. स्पर्धेमुळे त्यांना वास्तविक जीवनातील सेवासुविधांचा सामना करण्यास आणि नाविन्यपूर्णता, उद्योजकता आणि नेतृत्वाशी संबंधित त्यांची कौशल्ये सुधारण्यास सक्षम करते. खरोखरच बाहा एसएईइंडिया तयार अभियंते आणि स्टार्ट-अप्सची आणखी एक पिढी उभारायला मदत करेल. बाहा एसएईइंडिया २०२२ मधील सर्व सहभागी संघांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.”

पत्रकार परिषदेदरम्यान बाहा एसएईइंडियाचे संयोजक  हर्षित मर्चंट म्हणाले, “बाहा एसएईइंडियाच्या १५ व्या आवृत्तीत सर्व आदरणीय अतिथींचे आणि प्रसारमाध्यमांचे हार्दिक स्वागत. कार्यक्रमाचे पहिले दोन टप्पे रोमांचक होते आणि आता वेळ आली आहे २ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर होणाऱ्या बाहा एसएईइंडियाच्या प्रत्यक्ष फेरीची. या प्रत्यक्ष स्पर्धेत संघांची ताकद आणि जोम तपासला जाणार आहे. संपूर्ण नवीन स्तरावर या कार्यक्रमाला घेऊन जात कार्यक्रमाच्या नवीन स्थानासह बाहा एसएईइंडिया ही स्पर्धा सहभागी संघांसाठी अधिक आव्हानात्मक बनणार आहे. मी सर्व संघांचे स्वागत करतो आणि संघांना आणखी एका रोमांचक सत्रासाठी शुभेच्छा देतो! ज्यांनी या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे मूल्य पाहिले आणि या कार्यक्रमासाठी जे ताकदीचे आधारस्तंभ राहिले आहेत अशा आमच्या प्रायोजकांचेही विशेष आभार मानतो.”

Leave a Reply

%d bloggers like this: