‘सेल्फी’मध्ये अक्षय कुमार सोबत दिसणार नुसरत भरुचा आणि डायना पेंटी
अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी लवकरच हे दोन्ही कलाकार आपल्याला ‘सेल्फी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत आता नुसरत भरुचा आणि डायना पेंटी या दोन अभिनेत्री या चित्रपटात लीडिंग लेडीच्या भूमिकेत दिसणार आहे. तरण आदर्श यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. ‘सेल्फी’ हा चित्रपट ‘ड्रायविंग लायसन्स’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असणार असून यांचे दिग्दर्शन दिग्दर्शक राज मेहता करणार आहेत.
अक्षय कुमार काही महिन्यांपूर्वीच ‘सेल्फी’ या नवीन चित्रपटची घोषणा केली होती. त्यानंतर अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक छोटा व्हिडिओ पोस्ट करीत अभिनेता इमरान हाश्मी या नवीन चित्रपटाचा भाग असणार असल्याचे सांगितले होते. तर आता या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी या दोघींच्याही भूमिका असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली असून यामध्ये या चौघांची केमेस्ट्री काशी जमतिये हे पहाव लागेल.
दरम्यान, नुसरत अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट अक्षयच्याच प्रोडक्शनमध्ये तयार होत असून त्याचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत.