प्रत्येक माणसातील राम पहायला शिकायला हवे – ह.भ.प. धनश्री आठल्ये यांचे मत

पुणे : जो जीव जिवंत आहे, त्या प्रत्येकात राम आहे. त्या प्रत्येकातील राम पहायला आपण शिकलो की, भगवंताशी आपली नाळ जोडली जाते. ज्यावेळी आपण भगवंताच्या भक्तीत तल्लीन होतो, तेव्हा कितीही संकटे समोर आली तरी त्यातून सहज बाहेर काढण्यासाठी परमेश्वर आपल्याबरोबर असतो, असे ह.भ.प. धनश्री आठल्ये यांनी कीर्तनात सांगितले.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आमलकी एकादशी निमित्त तुळशीबाग राम मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. ह.भ.प. धनश्री आठल्ये यांनी श्रीकृष्ण, सुदामा, पृथ्वीराज चौहान, स्वामी स्वरूपानंद, चैतन्य महाप्रभू यांच्या मैत्रीची उदाहरणे देवून परमेश्वराच्या आणि भक्ताच्या मैत्रीचे निरूपण केले.

ह.भ.प.धनश्री आठल्ये म्हणाल्या, कोणतीही धनाची, वैचारिक किंवा धर्माची पातळी न बघता भगवंत तुमच्यातील सख्य बघतो. जिथे सख्य असते तिथे स्वत: भगवंत भक्तासाठी धावत येतो. फक्त तुम्ही निस्वार्थी भावनेने त्याची आठवण ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीरंग चासकर (तबला), साहिल पुंडलीक (पेटी) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: