डॉ. प्रमोद चौधरी ठरले प्रतिष्ठित ‘होल्मबर्ग पुरस्कार’ मिळविणारे पाहिले भारतीय
1983 मध्ये सुरू झालेली प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी डॉ. चौधरी यांच्या दृढ नेतृत्वाखाली जगातील आघाडीच्या औद्योगिक बायोटेक कंपन्यांपैकी एक बनली आहे. कंपनीने ‘सस्टेनेबल क्लायमेट अॅक्शन’ हे ध्येय ठेवून, जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आधारित ईपीसी सोल्यूशन्स विकसित आणि उपलब्ध करून दिले आहे. प्राजचे नाविन्यपूर्ण डिकार्बोनायझेशन आणि कार्बन रीसायकल सोल्यूशन्स ‘रेस टू झिरो कॅम्पेन’शी साधर्म्य साधत कार्बन इंटेसिटी कमी करण्यात उपयुक्त ठरत आहेत.
या पुरस्काराबाबत एबीसीएल 2022 परिषदेचे मुख्य संयोजक जिम लेन म्हणाले, “ शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने स्थिर नेतृत्व, तांत्रिक कौशल्य आणि वचनबद्धता आवश्यक आहे आणि डॉ. चौधरी यांच्यामध्ये ते सर्व गुण आहेत. शाश्वत इंधन आणि जैव-रसायन क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील ते अग्रणी व्यक्तीमत्व आहेत. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी किमतीत कच्चा मालाची उपलब्धता करून देण्याचा दिशेने डॉ. चौधरी यांची भूमिका मार्गदर्शक ठरत आहेत. आपल्या आशावाद आणि सकारात्मकतेच्या माध्यमातून डॉ. चौधरी हे नेहमीच भविष्यातील उत्पादने विकसित करण्यासाठी नवीन पिढीला प्रेरणा देतात.”
या प्रसंगी डॉ. चौधरी म्हणाले की, “ ज्यावेळी आपण स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत अशा वेळी हा पुरस्कार पहिल्यांदाच भारतात आला आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या COP26 शिखर परिषदेत नमूद केल्याप्रमाणे राष्ट्राच्या शून्य कार्बन वचनबद्धतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैव अर्थव्यवस्था आपल्या भरारीसाठी सज्ज आहे. जैव-अर्थव्यवस्थेचा ध्वजवाहक म्हणून, प्राज या उदयोन्मुख संधींचा फायदा घेण्यासाठी सक्षम असून, मला खात्री आहे की, टीम प्राज या क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. पुरस्कार प्रक्रियेत सामील असलेल्या आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.”
