चित्ररथाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ संकल्पनेबाबत धडे

पुणे  – जिल्हा माहिती कार्यालय पुणे मार्फत जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर आधारीत जनजागृती करण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि एलईडी वाहनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वनसंवर्ध आणि वन वणवा नियंत्रणाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील वनक्षेत्रालगतच्या गावातील शाळेत शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी, आंबेगाव तालुक्यातील तेरुंगण, राजपूर गावातील शाळेत विद्यार्थ्यांना चित्ररथ एलईडीच्या मदतीने वनवणवा नियंत्रणाचे महत्व सांगण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने चित्ररथावरील दृश्यांचे अवलोकन केले. ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ संदर्भात माहितीपट आणि दृश्यांच्या माध्यमातून चांगली माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली .

Leave a Reply

%d bloggers like this: