Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 20 कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोना रुग्ण संख्या इतर शहरांच्या तुलनेत कमी होत असली तरी त्यामध्ये चढ- उतार कायम आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 20 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही.

पुणे शहरात आजपर्यंतची एकूण कोरोना रुग्ण संख्या ही 6 लाख 61 हजार 757 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 522 हजार 95 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत पुणे शहरात 9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 114अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1893 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading