fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मृतदेह खांद्यावर नेऊन टाकला कात्रज बायपास जवळ 

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना मंतरवाडी येथे आज उघडकीस आली आहे. धक्कादायकबाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपास जवळ मोकळया जागेत फेकून दिला होता. त्यामुळे परिसरात घाबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणी मृत महिलेचा पती राहूल ज्ञानोबा फडतरे (वय-32 रा. मंतरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचे वडील दत्तात्रय कृष्णा शेडगे (वय-50,रा.परिंचे, ता. पुरंदर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या राहूल फडतरे (23) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. राहूल फडतरे हा वाहन चालक म्हणून काम करत असून, त्याचे सात वर्षापूर्वी विद्या बरोबर लग्न झाले होते. त्यांना तीन वर्षाचा मुलगाही आहे. राहुल हा विद्याच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तिच्याशी वाद घालत होता. याबाबत तिने सासवड पोलिसांकडे तक्रार देखील दिली होती. यात तिच्या सासरच्यांवर कारवाई देखील झाली आहे. हा वाद संपविण्यासाठी दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांची बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार माहेरी गेलेली विद्या पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेली होती. मात्र, 21 मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याचे सुमारास राहुल याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह साडीत गुंडाळून खांद्यावर उचलून घराजवळील मोकळया जागेत फेकून दिला.

दरम्यान, काल कात्रज-बायपास रस्त्यावर मंतरवाडी येथील मोकळया जागेत हडपसर पोलीसांना एका साडीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलीसांनी तिची ओळख पटवून त्याबाबत राहुल याच्याकडे चौकशी केली असता आपणच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे पुढील तपास करत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading