महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांच्या वतीने शिवजयंती साजरी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांच्या वतीने लाल महाल शनिवार वाडा पुणे येथे प्रथमच मोठया उत्साहात महिला शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवजन्माचा पाळणा सुवर्णा  निंबाळकर,सावनी शिखरे यांनी गायन करून शिवजयंती उत्सवास सुरुवात झाली त्यानंतर महिला शाहीर वनिता जोशी यांनी गड आला पण सिंह गेला हा पोवाडा सादर करून तान्हाजी मालुसरे याचा इतिहास जागृत केला. 

याप्रसंगी लेफ्टनंट जनरल दतात्रय शेकटकर (निवृत्त) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्राकरिता योगदान सीमेवरील सैनिकांनमध्ये छत्रपती शिवरायाचे युद्धनीती रणनीती याचा मोठा प्रभाव आहे त्यामुळेच आपण सर्वांनी प्रथम भारतीय ही आपली ओळख कधी विसरता कामा नये राष्ट्र म्हणून आपण शिवरायांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणले पहिजे असे विचार लेफ्टनंट जनरल दतात्रय शेकटकर यांनी मांडले.

शिवजयंती उत्सवाचे आयोजन पुणे शहर अध्यक्षा वनिता वागासकर यांनी केले याप्रसंगी मनसे नेते राजेंद्र वागासकर शहर अध्यक्ष वसंत मोरे उपस्थित होते उसत्व यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्षा सुशीला नेटके सचिव पुष्पा कनोजिया व महिला पदाधिकाऱ्यांनी यांनी मेहनत घेतली शिवप्रेमी नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Leave a Reply

%d bloggers like this: