Sunday, November 22, 2026
BusinessLatest News

गोखले कन्स्ट्रक्शन्सने उचलले पारदर्शक असे ग्राहकाभिमुख पाउल

दरवाढ होण्याआधी घर घेण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध

पुणे : कायमच ग्राहकाभिमुख योजना राबविणाऱ्या आणि शहरातील मोक्याच्या जागी निवासी व व्यावसायिक प्रकल्पांच्या निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या गोखले कन्स्ट्रक्शन्स तर्फे घर खरेदीदारांसाठी एक विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही संधी आहे शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी साकारात असलेल्या प्रकल्पांमध्ये दरवाढ होण्याआधी सदनिका किंवा व्यावसायिक जागा घेण्याची.

याविषयी अधिक माहिती देताना गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “बांधकाम साहित्याच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेली वाढ, काही जागतिक घडामोडींमुळे मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होणाची शक्यता, रेडी रेकनर मधील प्रस्तावित दरवाढ आणि नवीन मालमत्तांच्या खरेदीवर मेट्रो सेस आकारण्यात येण्याची शक्यता  या सर्व बाबी लक्षात घेता घर खरेदी ताबडतोब महागणार आहे हे आता जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही काही काळ आमच्या ग्राहकांना या दरवाढीची झळ बसू नये या साठी काही उपक्रम राबवीत आहोत.”

“यामध्ये आम्ही येत्या ३० एप्रिल पर्यंत गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या निर्माणाधीन असणाऱ्या सर्व प्रकल्पातील सदनिका किंवा व्यावसायिक जागांचे दर वाढवणार नाही. दरवाढ होण्याआधी घर गेण्याची संधी अत्यंत पारदर्शक पद्धतीने आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत. आमच्या सर्व प्रकल्पांमधील सदनिकांच्या किमतींमध्ये ३० एप्रिल नंतर साधारणतः रुपये १००० प्रती चौरस फुट इतकी वाढ होणार आहे.” असेही गोखले यांनी नमूद केले.

पुणे शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आकार घेत असलेल्या प्रकल्पांमधून आपले स्वप्नातील घर दरवाढ होण्या आधी ग्राहकांना निवडता येईल. ज्यामध्ये औंध रस्ता, डहाणूकर कॉलनी, रामबाग कॉलनी, आयडीयल कॉलनी, करिष्मा सोसायटी चौक, कर्वे नगर, पटवर्धन बाग, प्रभात रस्ता, मुकुंद नगर, सुभाष नगर आणि सहकार नगर येथील गृहप्रकल्पातील सदनिका तर कोथरूड येथील गोखले बिझनेस बे या भव्य व्यापारी संकुलातील व्यावसायिक जागांचा समावेश आहे.

गोखले कन्स्ट्रक्शन्सने आजवर १२० हून अधिक निवासी प्रकल्प पूर्ण केले असून त्यात सुमारे ४० लाख चौरसफुट इतक्या बांधकामाचा समावेश आहे. सध्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी साधरणतः ३५ लाख चौरस फुट इतके बांधकाम असलेल्या प्रकल्पांची निर्मिती गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply