डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत आजी-आजोबांचा मेळावा

 

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत आजी-आजोबांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ‘मुलखावेगळी माणसे’ हा कार्यक्रम सादर केला. लता मंगेशकर, डॉ. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे या थोर व्यक्तिंबरोबरील मुलाखतींचे खुमासदार किस्से सांगितले. आजी-आजोबांशी मुक्त संवाद साधला. कार्यक्रमाची सुरूवात बिल्वा द्रविड यांच्या सरस्वती वंदनेने झाली. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी प्रास्ताविक आणि अमृता भोई यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: