fbpx

शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्या बदलली- प्रवीण दरेकर

पुणे: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सूचक विधान केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत जे बोलत आहेत. तो त्यांचा बदललेला हिंदुत्वादी विचार आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते करून दे करून दे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. 370 कलम हटवल्याने स्वप्नातला काश्मीर पुन्हा बहाल झाला आहे. तो राऊतांनी पाहावा.असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, त्यांना सत्य पचनी पडत नाही. शिवसेना हतबल झाली आहे. त्यांचे हिदुत्वाबद्दलची विधाने गांभीर्याने घेऊ नयेत. शिवसेनेला संगतीचा परिणाम झालेला दिसतोय. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हाताची घडी घालून उभे राहतात आणि अब्दुल सत्तार  शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका मांडतात. यातच सगळं आलं., असं  विधान करत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. 370 कलम हटवल्याने स्वप्नातला काश्मीर पुन्हा बहाल झाला आहे. तो राऊतांनी पाहावा.असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन तीन महिन्यापासून आजारी होते त्यामुळे ते घरी होते ते आता महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी बाहेर पडणार आहेत. त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले,मुख्यमंत्री राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार आहेत, याचं मी स्वागत करतो, आणि उशिरा का होईना मुख्यमंत्री अडीच वर्षांनंतर जवळून बघायला मिळणार आणि त्याचा आनंद होणार, मात्र त्यांनी मंत्रालयात तरी बसायला हवं होतं. 
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप सतत आक्रमक झाली आहे. त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले, नवाब मलिक हे देशद्रोही व दाऊदच्या संपर्कात नसतील तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अशी आमची मागणी आहे .असे प्रवीण दरेकर म्हणाले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: